खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...

अमित शहा यांचा काँग्रेस अध्यक्षांच्या विधानावर पलटवार

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खरगे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना ओढले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे यांच्या विधानावर पलटवार केला. 

जम्मू कश्मीर मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवल्याखेरीस मरणार नाही असे विधान केले होते. या विधानाचा अमित शहा यांनी समाचार घेतला. 

काँग्रेस नेत्यांच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल किती प्रमाणात द्वेष आणि भीती आहे हेच खर्गे यांच्या विधानावरून दिसून येते, असे शहा म्हणाले. वास्तविक पंतप्रधान मोदी, मी आणि आम्ही सगळे खरगे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे. सन 2047 मध्ये विकसित भारत त्यांना बघायला मिळावा, अशी आमची इच्छा आहे, असे अमित शहा यांनी नमूद केले. 

आपण जम्मू कश्मीरला वाऱ्यावर सोडणार नाही. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेपर्यंत आपण लढत राहणार. माझे वय 83 वर्ष आहे. मात्र, मोदींना सत्तेवरून हटवल्याखेरीज आपण मरणार नाही. जम्मू काश्मीरच्या नागरिकांची बाजू ऐकत राहणार. त्यांच्यासाठी लढत राहणार, असे खर्गे जाहीर सभेत बोलले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकारण जम्मू-काश्मीरच्या युवकांबद्दल कळवळा दाखवत आहेत. वास्तविक मोदी यांच्यात दहा वर्षाच्या कार्यकाळात देशभरातील युवकांचे भवितव्य अंधारले आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'