'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे'

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था

क्वाड देशांनी एकत्र राहून काम करणे हे केवळ त्या देशांच्या हिताचे आहे असे नाही तर संपूर्ण मानव जातीच्या ते हिताचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत बोलताना केले.या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस उपस्थित होते. 

वन अर्थ, वन हेल्थ 

क्वाड देश जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते केवळ त्या देशातील सरकारांपुरते नसते तर कोट्यावधी जनतेच्या भल्याचा विचार करून काम केले जाते. कोरोना संकटाच्या काळात इंडो पॅसिफिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून क्वाड देशांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. या पुढील काळात कर्करोगाशी लढा देण्यासाठी रेडिओथेरपीच्या तीन कोटी लसी उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचा फायदा कोट्यावधी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे, असे मोदी यांनी नमूद केले. 

अमेरिकन कंपन्यांच्या भारतीय प्रमुखांची भेट 

विविध क्षेत्रातील अमेरिकन कंपन्यांच्या भारतीय प्रमुखांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर चिप्स, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर वृद्धी करण्याचा मानस दोन्ही देशांनी व्यक्त केला. 

अमेरिकेकडून भारतावर स्तुतीसुमने

सध्याच्या काळात जगभर अस्थिर आणि संघर्षमय वातावरण असताना भारत निभावत असलेल्या भूमिकेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी भारताचे कौतुक केले. विशेषतः पोलंड सह संघर्षात होरपळणाऱ्या युक्रेनचा दौरा करण्याच्या मोदी यांच्या निर्णयाचे महत्त्व बायडेन यांनी विशद केले. युक्रेनच्या पुनर्वसनासाठी मानवी दृष्टिकोनातून भारताने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |