मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी कुलदीप प्रधान यांची नियुक्ती
By Satish Gade
On
वडगाव मावळ, प्रतिनिधी
मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर शासनाच्या आदेशाने कुलदिप प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे नांदेड येथील लोहा पंचायत समिती येथून प्रधान यांची मावळ पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांनी काल (गुरुवारी) पदभार स्वीकारला.
मावळचे सध्याचे प्रभारी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची काही महिन्यांपूर्वीच मुळशी येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. अखेर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेशाने मावळ पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी कुलदिप प्रधान यांची नियुक्ती झाली
मावळ पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी के. के. प्रधान यांचे गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले व सर्व केंद्रप्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Tags:
Comment List