अवैधरित्या गांजा वाहतूक करणारा अटकेत

१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

अवैधरित्या गांजा वाहतूक करणारा अटकेत

वडगाव मावळ/सतिश गाडे 

विक्रीच्या उद्देशाने अवैधरीत्या गांजा वाहतूक करणाऱ्या एका युवकाला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत पोलिसांनी वाहनासह असा एकूण १ लाख १०  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सतीष ऊर्फ संतोष ऊर्फ माया सुरेश डोळस (वय २६ वर्षे, रा. अनंत सृष्टी सोसायटी, जांभुळ, ता. मावळ) अशी अटक करण्यात आरोपीचे आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.२८ सप्टेंबर) रोजी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास उपजिल्हा रूग्णालय, कान्हे फाटा येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन भगवान काळे (वय ४२ वर्षे) यांनी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या  याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २८) रोजी उपजिल्हा रूग्णालय व ट्रामा केअर युनिट कान्हे फाटा येथील गेट नंबर १ च्या समोर रस्त्यावर सतीष ऊर्फ संतोष ऊर्फ माया सुरेश डोळस (वय २६ वर्षे, रा. अनंत सृष्टी सोसायटी, जांभुळ, ता. मावळ) हा त्याच्या ताब्यातील क्टीव्हा स्कुटरच्या (क्र. एमएच १४ एलएफ ८९३३) डिक्कीमध्ये ०८५ ग्रॅम वजनाचा 'गांजा' हा अंमली विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगून वाहतुक करताना मिळून आला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून गांजासह एकूण १ लाख १० हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई एस. ए. जावळे हे करीत आहेत. ही कारवाई संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, हेड कॉन्स्टेबल सचिन काळे, उमाजी मुंढे, सचिन देशमुख, विठ्ठल पतुरे, अधिकराव झेले यांनी केली.

Share this article

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर
प्रहारचे कार्यालय म्हणजे सामान्यांसाठी कल्पवृक्षच |
प्रहारचे कार्यालय म्हणजे सामान्यांसाठी कल्पवृक्षच |
अवैधरित्या गांजा वाहतूक करणारा अटकेत
नवनवीन व्यवसाय उभारून खरेदी विक्री संघ बळकट करा