मावळात एक लाखाहून अधिक महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना ; आमदार सुनिल शेळके यांची माहिती

मावळात एक लाखाहून अधिक महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

वडगाव मावळ/सतिश गाडे 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त माता-भगिनींना लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.विविध ठिकाणी नोंदणी केंद्रे उभारुन योजना प्रभावीपणे मावळ विधानसभेत राबविण्यात आली.त्यामुळेच तालुक्यातुन आतापर्यंत एक लाख तीन हजार 178 भगिनी योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष, आमदार सुनिल शेळके यांनी दिली. 

 मावळ विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती व आढावा घेण्यासाठी मावळ तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनिल शेळके होते.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

बैठकीस मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, हवेलीचे तहसीलदार जयराज देशमुख, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, एकात्मिक बाल विकास अधिकारी विशाल कोतागडे, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी प्रवीण निकम, देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घाडगे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उप मुख्याधिकारी ममता राठोड, तसेच मावळ विधानसभेतील इतर अधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके पुढे म्हणाले, काही भगिनींचे अर्ज अपूर्ण माहिती, अर्धवट कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे पात्र ठरल्या नसतील. तसेच ज्या महिलांची सर्व कागदपत्रे असुनही अर्ज योग्य ठिकाणी भरले नसल्यामुळेच लाभ मिळाला नसेल.त्यांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा अधिकृत केंद्रांवरच अर्ज भरणे आवश्यक होते.मावळातुन जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला याबद्दल समाधानी आहे.

 यावेळी आमदारांनी बैठकीत पडताळणी केलेले अर्ज, मंजूर झालेले अर्ज याची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी सेविका व प्रशासन स्तरावरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. या योजनेच्या लाभापासून आपल्या तालुक्यातील कुठलीही पात्र महिला-भगिनी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घेतली आहे.

Share this article

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |