नवीन भाजी मंडईचे काम प्रगतीपथावर |

नवीन भाजी मंडईचे काम प्रगतीपथावर |
प्रगतीपथावर असलेले भाजी मंडईचे काम

 

म्हसवड दि. २६
म्हसवड शहराच्या वैभवात भर घालणारी अद्यावत अशी भाजी मंडईचे ठप्प झालेले काम माण - खटावचे नेते आ. जयकुमार गोरे व मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सुरु झाले असुन प्रगतीपथावर असलेली भाजी मंडई लवकरच म्हसवडकरांसाठी उपलब्ध होणार आहे.
माण - खटावचे दमदार आमदार अशी ओळख असलेल्या आ. जयकुमार गोरे यांची म्हसवड पालिकेत २०११ ते २०१६ अशी एकहाती सत्ता होती, त्यावेळी म्हसवडकर नागरीकांना अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आ. गोरे यांनी पालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देताना शहरात अनेक विकासकामे पुर्ण ही केली, त्यामध्ये शहरात अद्यावत अशी गार्डन उभारणी असो, अथवा शहरासाठी अद्यावत अशी स्मशानभुमी असो अशी अनेक विकास कामे आ. गोरे यांच्यामुळे पालिकेला पुर्ण करता आली. तर काही विकास कामांचा  शुभारंभही करण्यात येवुन जवळपास ७० ते ८० टक्के कामे पुर्णही करण्यात आली होती, त्यापैकीच एक असलेली शहरातील अद्यावत अशी भाजीमंडईची इमारत आहे, २०१५ साली आ. गोरे यांनी नगरविकास खात्यातुन  कोट्यावधी रुपयांचा निधीही पालिकेला उपलब्ध करुन दिला होता. त्यामध्ये अद्यावत भाजी मंडईसाठी १ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देताना भाजी मंडईचे काम ही मोठ्या दिमाखात सुरु केले, सदर भाजी मंडईचे काम प्रगतीपथावर असतानाच सन २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत आ. गोरे यांच्या हातुन म्हसवड पालिका निसटली अन् शहरात सुरु असलेली विकासकामे ठप्प झाली. त्यानंतर पालिकेतील सत्ताधार्यांनी सदरच्या भाजी मंडईचे डिजाइन पसंत नसल्याचे कारण पुढे करीत नव्याने डिजाइन करण्याचे ठरवले मात्र त्यानंतर ५ वर्षाचा कार्यकाल उलटला तरी तत्कालीन सत्ताधार्यांना नवीन डिजाइन मिळाले नाही ना उर्वरीत काम पुढे करता आले नाही. त्यामुळे अर्धवट उभारलेल्या भाजी मंडईला उकिर्ड्याचे स्वरुप आले त्याठिकाणी अवैध प्रकारांना ऊत आला, अनेक गैरप्रकार सुरु झाले तर काही जणांनी या इमारतीचा सार्वजनिक मुतारी म्हणुन वापर सुरु केला. अद्यावत होणार्या सार्वजनिक भाजी मंडईचे बकाल चित्र अनेक सुज्ञ म्हसवडकरांच्या नजरेला खटकु लागल्याने याविरोधात अनेकदा माध्यमांनीही आवाज उठवला शेवटी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी याबाबत गांभीर्याने पाऊले टाकीत सदर भाजी मंडईचे काम पुन्हा सुरु केले असुन सदर भाजी मंडईला रंगरंगोटी करण्यात आली आहे, तर आतील गाळ्यांना शटर्स बसवण्यात आले असुन संपुर्ण इमारतीमध्ये फरशा बसवण्यात आल्याने आता भाजी मंडईला नवे रुप मिळाले आहे. म्हसवड शहराच्या वैभवात या भाजी मंडईच्या रुपाने भर पडणार असल्याने म्हसवडकर नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत.

चौकट - 
अचारसंहितापुर्वी भाजी मंडईचे लोकार्पण करणार - मुख्याधिकारी - डॉ. सचिन माने 
सदर भाजी मंडईचे उर्वरीत कामाला सुरुवात केली असुन दररोज पालिका प्रशासनाच्या वतीने झालेल़्या कामाचा आढावा घेतला जात आहे, लवकरच अद्यावत अशी भाजी मंडई म्हसवडकर जनतेच्या स्वाधीन केली जाणार असुन विधानसभेची अचारसंहिता लागण्यापुर्वी सदर भाजी मंडईचे लोकार्पण करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.०००

Share this article

Tags:

About The Author

Mahesh Kamble Picture

म्हसवड तालुका प्रतिनीधी 

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'