मावळ विचार मंच संचलित सरस्वती व्याख्यानमालेच्या २०२४ अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड
कार्याध्यक्षपदी पुजा पिंगळे तर कार्यक्रम प्रमुखपदी भक्ती जाधव
By Satish Gade
On
वडगाव मावळ प्रतिनिधी
मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला सन २०२४ च्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर कार्याध्यक्षपदी सौ.पुजा प्रसाद पिंगळे कार्यक्रम प्रमुखपदी सौ.भक्ती सागर जाधव उपाध्यक्षपदी संतोष भालेराव ,सचिवपदी अमोल ठोंबरे खजिनदारपदी मकरंद बवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मावळ विचार मंचच्याचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर ,कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य,आणि सर्व संचालक मंडळ आणि सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
सरस्वती व्याख्यानमालेचे हे २४ वे वर्ष असून गुरुवार दि ३ ते शुक्रवार दि ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात व्याख्यानमाला संपन्न होणार आहे
Tags:
Comment List