'पाकिस्तानी चित्रपटांना महाराष्ट्रात पायघड्या नको'

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा

'पाकिस्तानी चित्रपटांना महाराष्ट्रात पायघड्या नको'

मुंबई: प्रतिनिधी

पाकिस्तानी चित्रपटाला भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पायघड्या घालणे महागात पडू शकते, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 'द लेजंड ऑफ मौला जट्ट' या पाकिस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात करू देणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे. 

फवाद खान आणि माहीरा खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला द लेजंड ऑफ मौला जट्ट हा पाकिस्तानी चित्रपट 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला राज ठाकरे यांचा विरोध आहे. कलेला देशांच्या सीमा नसतात वगैरे इतरांच्या बाबतीत ठीक आहे. मात्र, केवळ भारत द्वेषावर जगलेल्या पाकिस्तानला, त्यांची कला आणि कलाकारांना भारतात स्थान देता कामा नये, असे ठाकरे म्हणाले. हा चित्रपट भारतात कुठेच प्रदर्शित होऊ नये, अशी आपली इच्छा आहे. मात्र, इतर राज्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे. महाराष्ट्रात मात्र मनसे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनांनी देखील हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

हा चित्रपट ज्या काळात महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार आहे त्याच काळात नवरात्र साजरे केले जाणार आहे. या सणासुदीच्या आणि उत्साहाच्या काळात राज्यात तणावाचे आणि संघर्षाचे वातावरण असता कामा नये अशी आपली भूमिका आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिसांची देखील असणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने या चित्रपटाचे प्रदर्शन रोखणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

उरी येथे सन 2016 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. यापूर्वी फवाद खान आणि माहीरा खान यांनी बॉलीवूडच्या चित्रपटात काम केले आहे. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |