मावळातील साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप शिंदे यांची बिनविरोध निवड

2005 साली झालेल्या निवडणुकीत वडीलांचे अधुरे राहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण

मावळातील साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप शिंदे यांची बिनविरोध निवड

वडगाव मावळ/सतिश गाडे 

मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचायतमध्ये झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सर्व सामान्य कुटुंबातील आणि सर्वात तरुण नेतृत्व असणारे शिवसेनेचे संदिप दिनकरराव शिंदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सहकारी आणि ग्रामस्थ यांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरला.

2005 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचे वडीलदिनकर बंडू शिंदे यांचे अधुरे राहिलेले स्वप्न त्यांचे मुलाने पुर्ण केले. विकासाची तळमळ असणारे वडीलांचे सामाजिक कार्यातील हीत जोपासत आपलीही जनसेवेची तीच कार्यशैली जपत.संदिप शिंदे यांनी सदस्य पदावर असताना तब्बल सुमारे 1 कोटी रुपयांची विकासकामे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून केली आहे. तसेच 50 ते 60 लाख रुपये निधी मंजुर करुन घेतला आहे.

ग्रामपंचायत स्तरावर साते येथील शिंदे-भुंडे वस्तीवर प्रथमच लाईट,रस्ता व पाण्याची सुविधा संदिप शिंदे यांनी राबविली.तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके व  खासदार श्रीरंग बारणे यांचे माध्यमातून आगामी काळात भरगोस निधी मिळवणार आहे.तसेच जनसेवा करण्याची संधी मिळाली त्यामूळे ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या वस्त्यांसह गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सरपंच संदिप शिंदे यांनी सांगितले.

साते गाव हे एक विकासाचे मॉडेल ठरणार आहे व गावास राज्य सरकारचा आदर्श ग्राम पुरस्कार मिळावा असे माझे स्वप्न साकार होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.असे त्यांनी सांगितले.तसेच वरिष्ठ मार्गदर्शक आणि सहकारी व ग्रामस्थ यांचे देखील सरपंच संदिप शिंदे यांनी आभार मानले.

Share this article

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |