'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'

वंचित बहुजन आघाडीचा दावा

'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'

मुंबई: प्रतिनिधी 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येथे गुप्त बैठक झाली असून त्यांच्यामध्ये पडद्यामागून चर्चा सुरू आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी यामागील तथ्याचा उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठली. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी कोणाकोणाची भेट घेतली, कोणा कोणाशी चर्चा केली, याचा खुलासा उद्धव ठाकरे यांनी करावा, अशी मागणी मोकळे यांनी केली आहे. 

भाजप आरक्षण विरोधी पक्ष असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत आरक्षणवादी मतदारांनी भाजपविरोधी अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले आहे. ठाकरे यांची शिवसेना पुन्हा भाजपच्या वळचणीला जाऊन बसण्याचा विचार करत असेल तर ती आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होईल. त्यामुळे या बाबींचा खुलासा ठाकरे यांनी करावा, असे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे. 

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांपासून तब्बल 25 वर्ष एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना एकमेकांपासून दूर झाले. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीकेची झोड  उठवली. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये अर्थातच भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा चर्चेची दारे खुली झाली असली तर आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळे राजकीय समीकरण बघायला मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |