विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर

फलटणमधून दीपक चव्हाण यांच्या नावाची अजित पवार यांच्याकडून घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर

मुंबई: प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी जाहीर केला आहे. फलटण विधानसभा मतदारसंघातील एका ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भ्रमणध्वनीवरून उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित केले. 

दीपक चव्हाण हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाचे अर्थात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांचा प्रचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांचा उघडपणे प्रचार केला होता. फलटणच्या स्थानिक राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीतसिंह निंबाळकर यांच्यामधून विस्तवही जात नाही. या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

फलटण विधानसभा मतदारसंघातील सोळशी ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य झाले नाही तरीही त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपस्थितांन संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, फलटण विधानसभा मतदारसंघातून आपला पक्ष घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. दीपक चव्हाण हे आपले उमेदवार असणार आहेत. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे व आशीर्वाद द्यावे. फलटण विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्हा याच्या विकासासाठी आपल्याकडून अपूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली. माय बहिणींना भाऊबीजेची ओवाळण दिल्याशिवाय हा भाऊ गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर