प्रहार जनशक्ति पक्षाच्या तालुका युवा अध्यक्ष पदी अभिजीत धट |

प्रहार जनशक्ति पक्षाच्या तालुका युवा अध्यक्ष पदी अभिजीत धट |
प्रहार जनशक्ति पक्षाध्यक्ष आ. बच्चु ( भाऊ ) कडु यांच्या सोबत माण तालुका युवा अध्यक्ष अभिजीत धट.

म्हसवड दि. २२
प्रहार जनशक्ति पक्षाच्या माण तालुका युवा अध्यक्ष पदी येथील युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले अभिजीत पोपट धट यांची जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाध्यक्ष आ. बच्चु कडु यांनी नियुक्ती केली असुन नुकतेच त्यांना सदर निवडीचे पत्र देण्यात आले.
सातारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ति पक्ष उभारी घेत असुन जिल्ह्यातील विविध गावांमध्ये व शहरा - शहरात प्रहार ची ताकत वाढत आहे. सर्वसामान्यांचा, निराधारांचा, दिव्यांगाचा व जेष्ठांचा पक्ष म्हणुन प्रहार जनशक्ति पक्ष समोर आला आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पिसे यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणी जोरदार सुरु असुन माण - खटाव विधानसभा मतदार संघात या पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवली जात आहे. जिल्हाध्यक्ष असलेले अरविन्द पिसे यांनी आ. बच्चु कडु यांच्या माध्यमातुन या मतदार संघातील सामान्य जनतेची खुप मोठी कामे केली आहेत, सामान्य जनतेलाही हा पक्ष आपल्या हक्काचा वाटत असल्यानेच सर्वसामान्य जनतेने खुप मोठी ताकत या पक्षाच्या मागे उभी केली आहे. पक्षाची मतदार संघात वाढलेली ताकत पाहुनच अनेक तरुण या पक्षात सक्रीय होत आहेत. 
म्हसवड शहरातील युवकांचे आयडॉल ठरलेले अभिजीत धट यांनीही पिसे यांच्या सामाजीक कार्याला हातभार लागावा या हेतुने या पक्षात प्रवेश करुन सामाजिक कार्यात स्वत: ला वाहुन घेतले आहे, त्यांच्या याच याच सामाजिक कार्याची दखल घेवुन पक्षाने त्यांच्या तालुका युवा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असुन पक्षाचे अध्यक्ष असलेले आ. बच्चु कडु यांच्या प्रमुख उपस्थित पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात धट यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. अभिजीत धट हे उच्चशिक्षीत असुन युवकांचे मोठे संगठन त्यांच्या पाठीशी आहे. पिसे यांच्या सामाजिक कार्याने प्रेरीत होवुन धट यांनी प्रहार ची बँट हाती घेतली आहे. तळागाळातील सामान्य जनतेला त्यांचे हक्क व अधिकार मिळवुन देण्यासाठी धट यांनी घेतलेला पुढाकार पाहुन तालुक्यातील अनेक तरुण त्यांच्यासोबत जोडले जावु लागले असुन पक्षाने आपणावर जो विश्वास दाखवुन जी नवीन जबाबदारी आपणावर सोपवली आहे ती नवीन जबाबदारी आपण लिलया पेलुन दाखवु व माण - खटाव तालुक्यातील सर्व युवकांची संगठन करुन प्रहार जनशक्ति पक्ष हा सामान्य जनतेबरोबरच सर्वात मोठा तरुणांचा पक्ष असल्याचे सिध्द करुन दाखवु अशी प्रतिक्रिया नुतन युवा अध्यक्ष अभिजीत धट यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आगामी होवु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने माण - खटाव विधानसभा मतदार संघातुन अरविंद पिसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असुन एक सुसंकृत, उच्चविद्याविभुषीत, संयमी व सर्वसामान्यांना सोबत घेवुन जाणार्या पिसे यांच्या पाठीशी आपण सामान्य तरुणांची युवा शक्ती उभी करीत गावोगावी प्रहार जनशक्ति पक्षाची शाखा सुरु करणार असल्याचेही यावेळी धट यांनी स्पष्ट केले.०००

Share this article

Tags:

About The Author

Mahesh Kamble Picture

म्हसवड तालुका प्रतिनीधी 

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर
प्रहारचे कार्यालय म्हणजे सामान्यांसाठी कल्पवृक्षच |