प्रहारचे कार्यालय म्हणजे सामान्यांसाठी कल्पवृक्षच |

प्रहारचे कार्यालय म्हणजे सामान्यांसाठी कल्पवृक्षच |

म्हसवड दि. ३०IMG-20240928-WA0013
प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी म्हसवड शहरात सुरु केलेल्या कार्यालयात दिव्यांग, निराधार, बांधकाम कामगार, जेष्ठ नागरीक, परितक्त्या आदींना शासकीय योजनांचा लाभ मोफतपणे मिळवुन दिला जात असुन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जात असल्याने सर्वसामान्य गरजवंतांची याठिकाणी मोठी गर्दी पहावयास मिळत आहे, सामान्यांची याठिकाणी मोफतपणे कामे करुन दिली जात असल्याने संपूर्ण माण - खटावमधील सामान्य नागरीक येथे आपल्या विविध कामांसाठी येत असुन त्यांच्यासाठी सदरचे कार्यालय हे जणु कल्पवृक्षच ठरत आहे.
आपण धार्मिक कथांमध्ये अनेकदा कल्पवृक्षाबद्दल वाचले वा ऐकले आहे कि ज्या झाडासमोर जावुन आपण आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्यास ती इच्छा तो वृक्ष तात्काळ पुर्ण करुन देतो, मात्र तो वृक्ष पृथ्वीवर नाही तर तो स्वर्गात असल्याचेही अनेक कथांमध्ये सांगितले आहे. मात्र त्या कल्पवृक्षाचाच एक मानवी अवतार सध्या म्हसवड शहरात अवतरला असल्याचे सामान्य जनता सांगत असुन त्या मानवी अवतारातील कल्पवृक्षाचे नाव अरविंद बापु पिसे असे असल्याचेही ही सामान्य जनता निक्षुण सांगत आहे.
 अरविंद पिसे यांना सामान्य जनता कल्पवृक्षाची उपमा सामान्य जनता देत आहे याची माहिती घेतली असता या सामान्य कुटुंबातील व्यक्तीचे असामान्य काम समोर येवु लागले आहे. म्हसवडसारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या या व्यक्तीने घरची परिस्थिती हलाखीची असताना कसेबसे आपले शालेय प्राथमिक शिक्षण म्हसवड येथे पुर्ण केले त्यानंतर त्यांना इंजीनियरिंग साठी शहरात प्रवेश मिळाल्यावर त्याठिकाणी जायचे कसे, तेथे रहावयाचे कोठे, शिक्षण कसे घ्यायचे ? असे नानाविध प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले असतानाच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेही काही पुस्तके वाचली त्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले शिका व संघर्ष करा हे वाक्य त्यांना चांगलेच भावले अन् तेच वाक्य जगण्याचा त्यांनी निश्चय केला अन् त्यांनी आपल्या शिक्षणासाठीच संघर्ष सुरु केला, आपले इंजिनियरिंग ते शिक्षण पुर्ण करण्यासाठी त्यांनी पार्ट टाईम नोकरी पत्करली काम करीत करीत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले त्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरु केला, सुरुवातीला भांडवल नसल्याने अल्प भागीदार होत मित्रांच्यासोबत त्यांनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली मात्र व्यवसायातील त्यांनी अफाट मेहनतीच्या जोरावर आपला स्वतंत्र व्यवसाय सुरु करीत मुंबई, आलीबाग, पुणे आदी ठिकाणी मोठमोठी कामे सुरु करुन अनेक प्रकल्प उभारले. या मध्ये स्थिर स्थावर झाल्यावर त्यांनी आपला गाव हे आपले नाव असे म्हणत पुन्हा आपल्या गावाकडे ( म्हसवड ) मोर्चा वळवला अन् याठिकाणी त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला, हे करीत असताना त्यांनी काही लोकांना स्वखर्चातुन मदत करावयास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की समाजात अशी अनेक लोकं आहेत की त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणारे कोणीच नाही, नेतेमंडळी त्यांचा फक्त मतापुरता वापर करीत असुन‌ त्यांनाच त्या सामान्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, हे जेव्हा पिसे यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी या लोकांना मदत करावयास सुरुवात केली सर्वसामान्यांची कामे मोफतपणे करण्याचा त्यांना विलक्षण आनंद वाटु लागल्याने पुढे त्यांनी या कामातच समाधान मानले अन् अखंडपणे समाजसेवेत स्वत:ला वाहुन घेतले. आज म्हसवडसारख्या शहरात त्यांनी अशा सामाजिक कार्यासाठी स्वत:चे कार्यालय सुरु केले आहे. पिसे हे जे सामाजिक काम करीत आहेत तेच काम प्रहार जनशक्ती पक्ष करीत असल्याने त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा केवळ सामान्यांना न्याय मिळवुन हाती घेतला, त्यांची काम करण्याची पध्दत व त्यांचा कामाचा ‌मोठा आवाका पाहुनच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांनी त्यांच्यावर सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे, ही जबाबदारी पेलताना पिसे यांनी सुरुवातीला माण तालुक्यातील बांधकाम कामगार, दिव्यांग, निराधार, परितक्त्या, जेष्ठ नागरीकांची कामे करण्याचा झपाटा लावला, बांधकाम कामगारांसाठी कामगार नोंदणी, त्याचे नुतनीकरण , आणि त्यांच्या मुलांना मिळणारा शैक्षणिक लाभ मोठ्या प्रमाणावर मिळवुन दिला आहे. यासह बांधकाम कामगारांना शासकिय विविध योजनांचीही त्यांनी लाभ मिळवुन दिला आहे, त्यामुळे पिसे यांची बांधकाम कामगार नेते अशीही नवी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या अशा कामाची पध्दत व व्याप्ती सर्वत्र पसरु लागल्यानेच माणच्या लगोलग असलेल्या खटाव तालुक्यातील गरजवंताची रिघ त्यांच्या कार्यालयाकडे लागु लागली आहे. पिसे यांच्या सुरु असलेल्या सर्व  सामाजिक कार्याची संपूर्ण माहिती जेव्हा आ. बच्चु कडु यांना समजली तेव्हा त्यांनी पिसे हेच आमचे माण - खटावचे उमेदवार असतील असे माध्यमांसमोर जाहीर करीत विधानसभा निवडणुकीचे तिकीट पिसे यांना जाहीर केले.
उमेदवारी घोषीत झाल्यापासुन पिसे हे पायाला भिंगरी बांधुन माण - खटाव पिंजुन काढतील असे सर्वांना वाटत होते, मात्र फक्त समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानणार्या या अवलियाने सामान्य जनतेच्या स्वाधीन स्वत:ला करीत आपले काम सुरु ठेवले आहे. त्यांच्या प्रामाणिक व शुध्द हेतुमुळेच सामान्य जनता ही या माणसाच्या कामावर बेहद खुश झाली असुन त्यांनाच आता आपला मसिहा मानु लागली आहे. 
सामाजिक कार्यात अंखडपणे बुडालेल्या पिसे यांच्या असे लक्षात असे आले की माण - खटावमधील युवकांमध्ये खुप चांगले टँलेंट आहे, त्या विद्यार्थ्यांना फक्त योग्य दिशा देण्याची गरज आहे ही गरज ओळखुनच त्यांनी म्हसवड शहरात गत ७ वर्षापुर्वी मोफत अभ्यासिका सुरु केली आहे, आज ती अभ्यासिका स्पर्धा परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांना वरदान ठरली आहे. आजवर या अभ्यासिकेतील जवळपास १५० विद्यार्थी विविध शासकीय सेवेत रुजु झाली असुन या सर्वांच्या कुटुंबासाठी ही अभ्यासिका अधारवड ठरली आहे, तर आज ही हजारो विद्यार्थी याठिकाणी अभ्यास करण्यासाठी गर्दी करीत आहेत. दिवसरात्र ही अभ्यासिका सुरु असल्याने स्पर्धा परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांना ही अभ्यासिका संजीवनी ठरली आहे.
    पिसे यांचा राजकिय प्रवेश सुध्दा समाजकार्याला पुढे घेवुन जाण्यासाठी अथवा त्या कामाला अधिक गती मिळवुन देण्यासाठी झाला असला तरी ते राजकारणाबद्दल नेहमीच म्हणतात की मी येथे काही कमवायसाठी आलेलो नाही त्यामुळे मला काही गमवायची भिती अजिबात नाही माझे उद्दीष्ठ साफ आहे सामान्यांना न्याय अन् माण - खटावला पडणार्या पाऊसाच्या पाण्याचे योग्य नियोजन हिच महत्वाची कामे आपणाला येथे करावयाची आहेत, माझी पाटी कोरी आहे जनतेला माझे काम आवडले तर ती माझ्या पदरात आपले पवित्र दान देतील असा त्यांना विश्वास आहे. मात्र जनतेने आपल्या स्विकारु अथवा नाकारु आपण आपल्या हाती घेतलेला सामाजिक कार्याचा वसा यापुढेही असाच अखंडीतपणे सुरु ठेवणार असल्याचेही पिसे सांगतात.
पिसे यांच्या याच सामाजिक कार्याने प्रेरित झालेला सर्वसामान्य वर्ग त्यांच्या पाठीशी आपली ताकत उभी करु लागला आहे. सामान्य जनतेनेसाठी कल्पवृक्ष ठरलेल्या या असामान्य व्यक्तीमत्वाची पाळेमुळे समाजमनावर खोलवर रुजली आहेत एवढे मात्र नक्की.०००

Share this article

Tags:

About The Author

Mahesh Kamble Picture

म्हसवड तालुका प्रतिनीधी 

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर