'... तर महायुती सरकारमधून बाहेर पडू'

अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव अत्राम यांची धमकी

'... तर महायुती सरकारमधून बाहेर पडू'

नागपूर: प्रतिनिधी 

धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला तर आपण राजीनामा देऊन महायुती सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव अत्राम यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना आपल्याच सरकारला दिला आहे. 

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन होत आहे तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र प्रवर्गातून ते द्यावे यासाठी ओबीसी संघटना आरक्षण बचाव आंदोलन करीत आहेत. त्याच बरोबर धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या साठीही आंदोलन सुरू आहे. 

आरक्षणाच्या आंदोलनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले असताना धर्मराव  अत्राम यांच्या धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

यापूर्वी धर्मराव अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांनी पित्याच्या भूमिकेला छेद देत शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्राम हे चर्चेत राहिले. आमदारकी घरातच राहावी यासाठी अत्राम राजकीय खेळी करत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर बोलताना अत्राम यांनी आमदारकी राजघराण्यातच राहणार असा दावा केला आहे. तब्बल चाळीस वर्ष आमदारकी अत्राम घराण्यात राहिली असून यापुढेही कायम राहील. मी स्वतः मैदानात आहे. पुतण्या आणि मुलगी देखील मैदानात आहे, असे त्यांनी सांगितले. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'