महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा

लवकरच निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा

महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील जागावाटपाबाबत शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तब्बल पाच तास चर्चा पार पडली. या चर्चेनंतर महायुतीच्या जागावाटपाबाबत निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा केली जात आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा नुकताच नाशिक दौरा पार पडला. हा दौरा आटोपल्यानंतर या तिघांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात निवडणूक वेळापत्रक आखण्यासंबंधी या पथकाने राज्यातील 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यातील सण वार लक्षात घेऊन निवडणुकीचे वेळापत्रक आखण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. त्यानुसार सणांचे दिवस टाळून निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल, असे चित्र आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या पथकाने केलेल्या दौऱ्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून राजकीय घडामोडी, विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'