'हिजबुल्लाची ढाल बनलेली घरे उध्वस्तच होणार'

दक्षिण लेबनान रिकामा करण्याचे इस्राएलचे नागरिकांना आदेश

'हिजबुल्लाची ढाल बनलेली घरे उध्वस्तच होणार'

तेहरान: प्रतिनिधी

पेजर स्फोटाच्या घटनेनंतर इस्रायलने लेबनानवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. दोन दिवसाच्या तीव्र हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवरील हल्ले वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे दक्षिण लेबनान रिकामे करण्याचा इशारा इस्राएल सैन्याने नागरिकांना दिला आहे. हिजबुल्लाची ढाल बनलेली घरे उद्ध्वस्तच होणार अशी तंबी इस्रायलने दिली आहे. 

इस्राएल सैन्याने हमास प्रमाणेच हिजबुल्लाचे कंबरडे मोडले आहे. आता गाझापट्टी प्रमाणेच दक्षिण लेबनान बेचिराख करण्याची तयारी इस्रायलने केली आहे. दक्षिण लेबनानच्या नागरी भागातून हिजबुल्लाने इस्राएलच्या भूभागावर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्यामुळे लेबानिज नागरिकांनी आपल्या शत्रूंना आश्रय दिल्याची इस्राएलची भावना आहे. भयभीत झालेल्या लेबनानने मदतीसाठी अमेरिकेकडे याचना केली आहे. 

इस्रायलने बलाढ्य हिजबुल्लाचे लष्करी सामर्थ्य मोडकळीस आणले आहे. हिजाबुल्लाच्या १८ प्रमुख सैन्य नेत्यांना इस्रायलने यमसदनी पाठवले असून हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह यांच्यासह केवळ तीन जण शिल्लक आहेत. हिजबुल्लाकडे असलेल्या दीड लाखांपैकी निम्म्याहून अधिक शस्त्रास्त्र या संघर्षात वापरली गेली आहेत. त्यापैकी बहुतेक इस्राएल आणि अमेरिकेच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी निकामी केली आहेत. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |