मोसादने घडविलेल्या पेजर स्फोटांची इराणमध्ये दहशत

सैनिकांना दिले कोणतेही संपर्क साधन न वापरण्याचे आदेश

मोसादने घडविलेल्या पेजर स्फोटांची इराणमध्ये दहशत

तेहरान: वृत्तसंस्था 

हिजबुल्ला सदस्यांच्या तब्बल चार हजार पेजर्समध्ये स्फोटके पेरून इस्राएलची गुप्तहेर संस्था मोसादने घडवून आणलेल्या स्फोटांची दहशत इराणने देखील घेतली आहे. इराणी सैन्यातील सर्वांना आपले मोबाईल फोन, पेजर अशी सर्व संपर्क साधने जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतेही संपर्क साधन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

मोसादने १७ तारखेला दुपारी साडेतीनच्या सुमाराला एकाच वेळी हिजबुल्लाच्या तब्बल चार हजार सदस्यांच्या पेजरमध्ये स्फोट घडवून आणले. त्यात तीन हजाराहून अधिक जण जखमी झाले असून आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. हिजबुल्ला ही लेबनान येथील इराण पुरस्कृत दहशतवादी संघटना असून तिने स्वतःला राजकीय पक्ष म्हणून देखील घोषित केले आहे. 

सध्या इस्राएल आणि हिजबुल्ला यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. यापूर्वी इस्रायलने पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेचा बीमोड केला असून त्यांच्या ताब्यातील गाझा पट्टी बेचिराख केली आहे. 

हिजबुल्लाच्या पेजर स्फोटांप्रमाणेच इस्राएल आपल्या सैनिकांच्या संपर्क साधनांमध्ये स्फोट घडवून त्यांचे बळी घेईल, अशी चिंता इराणला वाटत आहे. त्यामुळे इराणी सैनिकांना आपले मोबाईल आणि पेजर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या सर्व उपकरणांची, विशेषत: उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपकरणांची कसून तपासणी करून त्यात स्फोटके पेरून ठेवली आहेत का, हे पडताळून पाहण्यात येणार आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'