मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

उपचार घ्यावे यासाठी महिलांचा आक्रोश

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

नांदेड: प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या आठव्या दिवशी प्रकृती गंभीररित्या खालावली आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे यासाठी महिला उपोषणस्थळी आक्रोश करीत आहेत. 

सगेसोयरेची अधिसूचना अमलात आणावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, या मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. 

आज उपोषणाच्या आठव्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा गंभीररित्या खालावली आहे. उपोषणस्थळी उपस्थित महिला व आंदोलक त्यांना उपचार घेण्यासाठी आग्रह करीत आहेत. 

 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |