मुरलीधर गणपत खाडे यांचे निधन 

वडगाव परिसरात हळहळ व्यक्त

मुरलीधर गणपत खाडे यांचे निधन 

पुणे: प्रतिनिधी 

वडगाव चे माजी सरपंच मुरलीधर गणपत खाडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, जनार्दन खाडे व नितीन खाडे ही दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. जनार्दन खाडे यांनी देखील वडगावचे उपसरपंचपद भूषविले आहे. 

सरपंच म्हणून त्यांनी वडगावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. नंतरच्या काळातही समाजकार्यात ते सक्रिय राहिले. वडगावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये खाडे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा मोठा उत्सव खाडे कुटुंबीयांच्या वतीने वडगाव येथे साजरा करण्यात येतो. या उपक्रमाची सुरुवात मुरलीधर खाडे यांनी केली. 

सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात आघाडीवर असलेल्या खाडे यांच्या निधनामुळे वडगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर