'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो'

रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर

'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो'

नागपूर: प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत आपण त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देऊ. वेळ पडली तर स्वतःचे मंत्रीपद आंबेडकर यांना देऊ, अशी खुली ऑफर रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. 

आंबेडकर यांचा पक्ष इतकी वर्ष निवडणूक लढवत आहे. मात्र, त्यांचे उमेदवार निवडून येत नाहीत. त्यांच्या पक्षाला अद्याप मान्यता देखील मिळालेली नाही. आपला पक्ष देशभरात आहे. नागालँडमध्ये, मणिपूरमध्ये आहे. आंबेडकर आपल्याबरोबर आले तर बहुजन समाज एकत्र येईल. आंबेडकर यांच्या पुढाकाराखेरीज रिपब्लिकन ऐक्य प्रत्यक्षात उतरू शकत नाही. त्यांनी पुढाकार घेतल्यास आपण अध्यक्षपदाचा आग्रह धरणार नाही. एकत्रित रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद आंबेडकर यांनी घ्यावे, असेही आठवले म्हणाले. 

आरपीआयला विधानसभेत हव्या 10 ते 12 जागा 

लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे दोन उमेदवार निवडून येणे शक्य होते. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. आता महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला दहा ते बारा जागा मिळाव्या. त्यापैकी चार ते पाच जागा विदर्भात मिळाव्या, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. 

केंद्रातील सरकार पूर्ण करणार कार्यकाळ 

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अल्पमतात येऊन पडणार का, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र, हा प्रश्न अनाठायी आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बहुमत आहे. अर्थातच केंद्रातील सरकार निश्चितपणे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |