शरद गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्तेपदी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्ती

शरद गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्तेपदी

मुंबई: प्रतिनिधी 

विख्यात साहित्यिक, दिग्दर्शक आणि वक्ते शरद गोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. 

चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. साहित्य संवर्धनाच्या उद्देशाने त्यांनी कोणतीही शासकीय मदत न घेता आजपर्यंत 176 साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. मराठी साहित्य सृष्टीच्या इतिहासात अशी कामगिरी करणारे गोरे हे एकमेव व्यक्ती आहेत. गोरे यांच्या युगंधर प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून दीडशे पेक्षा अधिक दर्जेदार ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले आहे. विशेषतः नवोदित लेखकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी गोरे हे कटिबद्ध आहेत. 

गोरे हे इतिहासाचे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचे अभ्यासत असून छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. गोरे हे नामवंत वक्ते असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गोरे यांनी महाराष्ट्रभर दोन हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. 

गोरे यांनी पाच मराठी चित्रपटांचे पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन केले असून काही चित्रपटात प्रभावी भूमिकाही निभावल्या आहेत. फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सव आणि जर्मनीतील बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोरे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'एक प्रेरणादायी प्रवास: सूर्या' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा पुरस्कार नुकताच मिळाला आहे. 

पक्षाचे प्रवक्ते म्हणून समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी गोरे यांच्याकडून चांगली कामगिरी केली जाईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केला.

 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |