गायकवाड व बोंडेच्या विरोधात काँग्रेस आक्रमक;वडगावात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन
गायकवाड व बोंडेवर गुन्हा दाखल करा; मावळ तालुका काँग्रेसची मागणी
वडगाव मावळ प्रतिनिधी
राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांची जीभ घसरली आहे. यावरुन आता काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.मावळात काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.यावेळी वडगाव मावळ पोलिस स्टेशचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले.
मावळ तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने गुरुवार (दि 19) जाहीर निषेध मोर्चाचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते
यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गट अध्यक्ष दत्तात्रय पडवळ युवक अध्यक्ष राजेश वाघोले ,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वहिले ,महिला कार्याध्यक्ष रूपाली शिरसागर तळेगाव शहर युवक अध्यक्ष विशाल वाळुंज तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष गफूर भाई शेख लीगल शेल अध्यक्ष खंडू तिकोने प्रतिमा हिरे वडगाव शहराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, कौस्तुभ ढमाले नाना खांदवे अनिष तांबोळी दामोदर मराठे प्रताप हुंडेकरी किरण मोकाशी गोरख काकडे गोरख काकडे जयश्री मदगे रोहित नलावडे निखिल मुऱ्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी मावळ तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार गट दत्तात्रय पडवळ खंडू तिककोने युवक अध्यक्ष विशाल वहिले राजेश वाघोले आदी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी “काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस देऊ” अस्वस्थ बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच पुन्हा भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी “राहुल गांधी यांची जीभ नका छाटू तर जिभेला चटके द्या” असे आक्षेपार्ह वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
वाचाळवीर आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे दोघांवरती तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करा. अशी मागणी मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली
Comment List