भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी

पिंपरी: प्रतिनिधी 

दीर्घकाळ संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटात आपली डाळ शिजत नसल्याचे लक्षात येतात तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पुत्र विक्रांत लांडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रिंगणात उतरतील, असे स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लांडे यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्वगृही परतण्याची तयारी केली. त्या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांची घरवापसी होणार हे निश्चित झाले आहे. 

यापूर्वी दीर्घकाळ लांडे हे शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडत होती. मात्र, स्वतः लांडे यांनी आपल्या घरवापसीबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे लांडे हे नेमके राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात, याबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या नाटकाचा पडदा आता उघडला गेला आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |