नांदेडजवळ तब्बल दोनशे जणांना विषबाधा

सार्वजनिक पाणीपुरवठा झाला दूषित

नांदेडजवळ तब्बल दोनशे जणांना विषबाधा

नांदेड: प्रतिनिधी 

येथील नेरले गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी दूषित झाल्यामुळे गावातील तब्बल 200 जणांना विषबाधा झाली आहे. त्यात प्रामुख्याने लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णांना नांदेड येथील खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दूषित पाणी प्यायल्यामुळे गावातील अनेक जणांना शुक्रवारी मध्यरात्रीपासून विषबाधा झाल्याने उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही जणांना डोकेदुखी आणि चक्कर येणे अशी लक्षणेही दिसून आली. या सर्व रुग्णांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. नांदेड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक नेरले गावात ठाण मांडून बसले आहे. 

सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीतून विषबाधा झाल्यामुळे सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा हा प्रश्न पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'