बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे न काढल्यास आत्मदहन - केवटे |

बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे न काढल्यास आत्मदहन - केवटे |
अजिनाथ केवटे

म्हसवड दि. २६
म्हसवड एस.टी. बस स्थानक परिसरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आपली दुकाने थाटल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असुन पालिकेने वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे त्वरीत हटवावीत अन्यथा पालिका विरोधात पालिका कार्यालयासमोर आपण आत्मदहन करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत केवटे यांनी पालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की म्हसवड एस.टी. बस स्थानक परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने ही रस्त्यावर मांडली असल्याने याठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे त्यामुळे याठिकाणी वाहतुक कोंडी ही नित्याचीच बनली आहे. तर शहरात प्रवेश करणारा हाच मुख्य रस्ता असल्याने याठिकाणी सातत्याने होणारी वाहतुक कोंडी ही सर्वांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पालिकेने याकडे त्वरीत लक्ष देवुन अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करावी व रस्त्याला होणारी अडचण दुर करावी अन्यथा आपण पालिका प्रशासनाच्या विरोधात दि. २७ रोजी पालिका इमारतीसमोर आपण आत्मदहन करणार असल्याचे केवटे यांनी म्हटले आहे.०००

Share this article

Tags:

About The Author

Mahesh Kamble Picture

म्हसवड तालुका प्रतिनीधी 

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'