भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अधिक पवार गटात खडाजंगी

भाजपा आमदार आणि नेत्यांचा राष्ट्रवादीसाठी प्रचार न करण्याचा ठराव

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अधिक पवार गटात खडाजंगी

पिंपरी: प्रतिनिधी 

लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार न केल्याचा आरोप करून भाजपा आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव केला आहे. या नेत्यांचा प्रामुख्याने अण्णा बनसोडे यांना स्थानिक पातळीवर विरोध आहे. 

महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधणे आव्हानात्मक ठरणार आहे. वरिष्ठ पातळीवर योग्य प्रकारे संवाद असला तरीही स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये खडाजंगी होत असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या नेत्यांना पेलावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत कमळाचे चिन्ह असलेल्या उमेदवार मिळाला नाही. त्यावेळी घड्याळाचा प्रचार करावा लागला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी भाजपचा प्रचार केला नाही. अजित पवार गटाने महायुतीचा धर्म पाळला मग आता आपण घड्याळाचा प्रचार का करायचा, असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे आता कमळाच्या चिन्हावरच उमेदवार असावा अशी पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांची मागणी असून जागावाटपापूर्वी ही भावना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे खापरे आणि गोरखे यांनी सांगितले. सदाशिव खाडे आणि भाजपचे प्रवक्ते राजू दुर्गे यांनीही दोन्ही आमदारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |