Hadapsar News | हडपसर मधील बहुप्रतीक्षित विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न!

लिलावती विठ्ठल तुपे यांच्या हस्ते नाट्यगृहाचे उद्घाटन 

Hadapsar News | हडपसर मधील बहुप्रतीक्षित विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न!

हडपसर, प्रतिनिधी

हडपसर- माळवाडी येथील बहुप्रतिक्षित पुणे महानगरपालिकेच्या विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा  स्व.खासदार विठ्ठल तुपे यांच्या पत्नी लिलावती तुपे यांच्या हस्ते  हडपसर मधील  भव्य अशा नाट्यगृहाचे फीत कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पुणे महापालिकेने बांधलेल्या नाट्यगृह उद्घाटनास  हडपसरचे आमदार चेतन तुपे, लिलावती तुपे, पाटील,महापालिका आयुक्त  डाॅ.राजेंद्र भोसले , अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज. बी.पी.शहर अभियंता प्रशांत  वाघमारे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ  शेवाळे ,अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, सुरेश घुले, माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक  फारुखभाई इनामदार, मारुती आबा तुपे,अशोक कांबळे, सुनील बनकर, प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका नंदा लोणकर, विजया वाडकर, सुरेखा कवडे,  हसीना इनामदार, वासंती काकडे, स्मिता गायकवाड, चंद्रकांत कवडे, मंगेश तुपे, शिवाजी पवार, जीवन जाधव, ॲड के.टी.आरु, प्रशांत बोगम, सिनेमा , नाट्यक्षेत्रातील कलाकार व विविध  क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित  होते.
सन २००९ पासून नाट्यगृहाच्या कामास सुरुवात झाली.गेली १५ वर्ष या नाट्यगृहाचे काम सुरू होते.दोन एकरात उभा राहिलेले नाट्यगृहाचा खर्च  सुमारे ४५ कोटी रुपये झाला आहे. व्यासपीठ  हे ९० बाय ४५ फुटाचे आहे. एकूण आसन क्षमता ८३८ आहे.त्यामध्ये व्यासपीठासमोर ६५९ व  बाल्कनीमध्ये  १७९ अशी बैठक व्यवस्था आहे.पार्किंग व्यवस्था १०७  मोटारी व  ३५० दुचाकी अशी आहे.

व्यासपीठामागील बाजूस  स्वच्छतागृह, दहा ग्रीन रूम्स, एक कॉन्फरन्स हॉल ,आर्ट गॅलरी व व्हीआयपी रूम्स यांसह हे सर्व नाट्यगृह वातानुकूलित आहे.अत्याधुनिक स्वयंचलित पडदे , चांगल्या दर्जाचे जेबीएल साउंड सिस्टीम, चांगल्या खुर्च्या बसण्यास प्रशस्त अशी आसन व्यवस्था,संपूर्ण महाराष्ट्र  राज्यात  असे नाट्यगृह वास्तु  कुठेच पहायला मिळणार नाही असे अत्याधिक सोयीसुविधांनी नटलेलं नाट्यगृह  रसिकांसाठी तमाम कलाकारांसाठी नाट्यगृह आजपासून खुले करण्यात आलेले आहे.

माझे वडील हडपसर कॅन्टोन्मेंट भागाचे तीनवेळा आमदार व खासदार म्हणून कारकिर्द गाजवली , ते उत्तम कलाकार ही होते. सिने अभिनेते निळू फुले व अन्य कलाकारांमध्ये वावरले.ते कलाकार असताना राजकारणात वळले.हडपसर भागात  एक नाट्यगृह व्हावे अशी त्यांची इच्छा होती.ती पूर्ण  झाली.मी गेले अनेक वर्ष या नाट्यगृहाच्या कामासाठी वेळोवेळी  पाठपुरावा केलेला आहे, अनेक वर्ष  काम लांबलेले होते. आज मितीस ते पूर्ण झाल्याचे समाधान आहे. त्यामुळे सांस्कृतिक वारसा असलेल्या हडपसर परिसरातील स्थानिक कलाकार व रसिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. श्रद्धेय विठ्ठल तुपे पाटील यांच्या नावाने हे नाट्यगृह आहे. आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी या नाट्यगृहाचा लोकार्पण होत आहे हा आमच्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. रसिकांना ते खुले होत असल्याचे मोठे समाधान आहे - चेतन तुपे पाटील, आमदार हडपसर विधानसभा
नाट्यगृह उद्घाटनास पालक मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्य मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसेपाटील, व शहरातील आमदार यांची उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत महापालिका आयुक्तांकडून नावे टाकण्यात आली. मनपा आयुक्त  यांनी दिलेल्या निमंत्रणास यातील कोणीच कार्यक्रमास उपस्थित राहिले नसल्याने उपस्थितीतां मध्ये चर्चा होती ऐवढा मोठ्या भव्य नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळा पार पडत असताना उपस्थित राहायला पाहिजे होते असे अनेकांनी बोलून दाखवले. लोकार्पण सोहळ्यासाठी  नाट्यगृह रसिकांनी खच्चा खच्च भरले होते.नेते मंडळी उपस्थित नसताना ही सोहळा दिमाखदार झाला.

Share this article

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर
प्रहारचे कार्यालय म्हणजे सामान्यांसाठी कल्पवृक्षच |