पहिली पाच वर्ष मतदार संघाची सेवा, पुढील काळात राज्याची सेवा

रोहित पवार यांच्या मंत्री पदाचे शरद पवार यांच्याकडून सूतोवाच

पहिली पाच वर्ष मतदार संघाची सेवा, पुढील काळात राज्याची सेवा

अहमदनगर: प्रतिनिधी 

पवार घराण्यातील उभारते नेतृत्व असलेल्या रोहित पवार यांची खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी तोंड भरून स्तुती केली. रोहित पवार यांनी पहिली पाच वर्ष मतदारसंघाची पुरेपूर सेवा केली असून पुढील काळात त्यांच्याकडून राज्याची सेवा घडवून येईल, असे सांगत शरद पवार यांनी आगामी काळात रोहित पवार यांना मंत्री पद मिळण्याचे सूतोवाच केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचे आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दाखवलेला सूर विधानसभा निवडणुकीतही कायम राहील आणि निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल, याची खात्री आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांच्या बोलण्या वागण्यातून व्यक्त होत आहे. त्यातच आता पवार घराण्यातील पुढच्या पिढीची राजकीय सूत्रे रोहित पवार यांच्या हाती असतील, हे शरद पवार यांनी सुचित केले आहे. 

कर्जत जामखेड सारख्या कायमस्वरूपी दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करण्याचे आव्हान रोहित पवार यांनी ताकतीने पार पाडले आहे. आज या परिसराचा कायापालट झाला आहे. रोहित पवार यांनी मतदारसंघासाठी 2 हजार 700 कोटी रुपयांचा निधी आणला. जलसंधारणासाठी 300 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. रोहित पवार यांनी पहिली पाच वर्ष मतदार संघाची सेवा केली. या पुढील काळात ते राज्याची सेवा करतील, असे पवार म्हणाले. 

राम शिंदे यांच्यावर खरमरीत टीका

एकीकडे रोहित पवार यांची कौतुक करतानाच शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. रोहित पवार हे स्थानिक भूमिपुत्र नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते. तुम्ही इथले असूनही दहा-दहा वर्ष आमदारकी आणि मंत्री पद उपभोगूनही मतदारसंघासाठी काहीही केले नाही, अशी टीका पवार यांनी केली. कोणतेही काम उभे करण्यास कर्तृत्व असावे लागते. उभे राहिलेले काम नष्ट करायला अक्कल लागत नाही. रोहित पवार यांना सहकार्य करता येत नसेल तर करू नका. मात्र, ते करीत असलेल्या कामात खोडा घालण्याचे उद्योग तरी करू नका, असे पवार म्हणाले. 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर
प्रहारचे कार्यालय म्हणजे सामान्यांसाठी कल्पवृक्षच |
प्रहारचे कार्यालय म्हणजे सामान्यांसाठी कल्पवृक्षच |
अवैधरित्या गांजा वाहतूक करणारा अटकेत
नवनवीन व्यवसाय उभारून खरेदी विक्री संघ बळकट करा