अल्पवयीन मुलाकडून दोन वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पीडितेवर उपचार सुरू

अल्पवयीन मुलाकडून दोन वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

नसरापूर: प्रतिनिधी

पुणे सातारा महामार्गावरील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील एका गावात घडली आहे. या घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आरोपीने पलायन केल्याचे समजले  यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेगवान गतीने तपासाची चक्रे फिरवून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कोयत्याचा धाक दाखवून केले पलायन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी अल्पवयीन आरोपीच्या  शेजारी राहत असून त्यांची एकमेकांशी ओळख होती. आरोपी अल्पवयीन मुलाकडे पीडित चिमुरडी खेळण्यास येत असल्याची.  लहान मुलीची आई कपडे धूत असताना अल्पवयीन आरोपीने चिमुरडीला त्याच्या खोलीत नेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाजाने मुलीची आई बंद असलेल्या खोलीकडे धावत गेली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने दरवाजा उघडला नाही. आरडाओरडा केल्यानंतर  अल्पवयीन आरोपीने मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. 

घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आपली चक्रे फिरवत आरोपीचा तात्काळ शोध घेत ताब्यात घेतले. या प्रकरणात  अल्पवयीन मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून,  याबाबत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार नराधम अल्पवयीन मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई करत आहेत.

मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील सोमवारी चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच दोन वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलानेच लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

भोसरीत माजी आमदार विलास लांडे हाती घेणार तुतारी
'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |