हिजबुल्लाच्या पेजरमध्ये मोसादचा धमाका

तीन हजाराहून अधिक अधिकारी जखमी

हिजबुल्लाच्या पेजरमध्ये मोसादचा धमाका

नवी दिल्ली: वृत्तसंस्था 

इस्राएल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या युद्धात इस्राएलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेने एकाच वेळी हिजबुल्लाच्या कनिष्ठ आणि मध्यम दर्जाच्या सुमारे ४ हजार अधिकाऱ्यांच्या पेजरचा स्फोट घडवून आणला. या अनपेक्षित हल्ल्यात ३ हजारापेक्षा अधिक अधिकारी जखमी असून ४०० जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये एक राजदूत आणि सुमारे २० वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

जानेवारी महिन्यात हिजबुल्लाच्या अधिकाऱ्यांना मोबाईल फोन वापरणे बंद करून पेजर वापरण्याचे आदेश देण्यात आले. मोसाद हिजबुल्लाच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल ट्रॅक करण्याच्या धास्तीने हा आदेश देण्यात आला. सध्याच्या काळात पेजरचा वापर होत नसल्याने तैवान येथील अपोलो पेजर्स या कंपनीला खास ऑर्डर देऊन हिजबुल्लाने ५ हजार पेजर घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, स्फोट झालेले पेजर्स आपण बनवले नसल्याचा दावा अपोलोने केला आहे. 

शनिवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी हिजबुल्लाच्या हजारो अधिकाऱ्यांच्या पेजरवर एक संदेश आला. तो बघण्यासाठी त्यांनी तो उघडताच पेजरचा स्फोट झाला. या स्फोटांसाठी पेजरमध्ये पीईटीएल हे प्लास्टिक स्फोटकासारखे रसायन वापरले गेले असल्याची माहिती उघड होत आहे. मात्र, हे मोबाईल ज्या कंपनीत बनले, अथवा मोबाईल मधील बॅटरीज ज्या कंपनीत बनल्या, त्या कंपन्याच मोसादच्या कटात सहभागी होत्या का, हा प्रश्न आहे. अर्थात हा सर्व कट ज्या गुप्ततेत पार पडला, त्या गुप्ततेवरून ही शक्यता कमी वाटते. मग मोसादने या पेजर्समध्ये स्फोटके कुठे आणि कधी भरली, या स्फोटकांना ट्रिगर करण्यासाठी बॅटरीची उष्णता वाढवण्यात आली की सर्किटचा वापर करण्यात आला, असे सगळे प्रश्न उभे राहतात. याची उत्तरे कालांतराने मिळणारच आहेत. कारण खुद्द हिजबुल्लाच खोदकाम करून हे शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. 

मोसादने उत्पादक कंपनी ते हिजबुल्ला या प्रवासादरम्यान या पेजरचा ताबा मिळवला. त्यामध्ये स्फोटकांचा समावेश असलेल्या बॅटरीज घातल्या, असा एक अंदाज ही व्यक्त केला जात आहे. स्फोटकांना ट्रिगर करणे अनेक प्रकारांनी शक्य आहे. मोबाईलचा सिग्नल देखील ट्रिगरचे काम करू शकतो. आयरिश रिपब्लिकन आर्मीच्या बंडखोरांनी यापूर्वीच असे अनेक उद्योग केले आहेत.

यात आणखी एक उल्लेखनीय माहिती म्हणजे बैरूत येथील अमेरिकन विद्यापीठात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून पेजर्स देण्यात आले होते. मोसादकडून हा धमाका होण्यापूर्वी काही महिने आधी या अमेरिकन विद्यापीठाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पेजर्स बदलले होते. त्या अर्थी इस्राएलने या कटाची पूर्वकल्पना अमेरिकेला दिली असणार हे स्पष्ट आहे. 

मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी करणे हा या हल्ल्यामागे इस्राएलचा निश्चितच उद्देश नसणार. तुमच्या पेजरपर्यंत घुसून आम्ही तुम्हाला हानी पोहोचवू शकतो, हेच इस्राएलला दाखवून द्यायचे होते. त्यात ते पूर्णतः यशस्वी झाले आहेत. या स्फोटामुळे झालेल्या शारीरिक जखमा भरून आल्या तरी त्यामुळे बसलेला मानसिक धक्का पचविणे हिजबुल्लाच्या लोकांना जड जाणार आहे. या शिवाय मोसाद मोबाईल ट्रॅक करेल म्हणून पेजरवर आलेल्या हिजबुल्लाच्या संपर्क यंत्रणेवरील विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने संपर्क यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्याचप्रमाणे इस्राएलकडून झालेल्या या अपमानाचे प्रत्युत्तर देण्यासाठी याच तोलामोलाचा हल्ला करण्याचे नियोजनही आखावे लागणार आहे. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
स्वतःच्या मुलींची लग्न दिली लावून, मग...
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'