बंधार्यात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृत्युदेह शोधण्यात पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश

म्हसवड 

म्हसवड परिसरातील शेंबडे वस्ती येथे उभारण्यात आलेल्या बंधार्यात दि.१५ रोजी बुडालेल्या हणमंत मोहन शेंबडे याचा मृत्युदेह अखेर म्हसवड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती लागला, मुलाचा मृत्युदेह पाण्यातुन बाहेर काढलेला मुलाचा समोर पाहुन त्याच्या आई वडीलांनी फोडलेला हंबरडा पाहुन उपस्थितांचे डोळेही पानावले.

शेंबडे वस्ती येथील बंधार्यात बुडालेला हणमंत हा त्याच वस्तीवर आपल्या आई - वडीलांसोबत रहात होता, तो इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत असुन तो व त्याची आई हे दोघेही मुक बधीर आहेत. हणमंत हा मुकबधीर असल्यानेच त्याला सातारा येथील गतीमंदासाठी असलेल्या शाळेत शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते, सध्या शाळांना गौरी - गणपतीच्या सुट्टया असल्याने हणमंत हा गावी ( शेंबडे वस्ती ) येथे आला होता. दि.१५ रोजी हणमंत व त्याची आई हे दोघेही बंधार्याच्या परिसरात असलेल्या त्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटर सुरु करण्यासाठी गेले होते, त्याठिकाणी नदीपात्रात खुप पाणी असल्याने सध्या या परिसरातील लोकं नदीच्या दोन्ही बाजुला बांधलेल्या रस्सीच्या साह्याने ये - जा करीत आहेत. त्यामुळे नदीच्या पैलतिरावर असलेल्या विहिरीवरील विद्युत मोटर सुरु करण्याकरीता आई ला नदीकिनारी बसवुन नदीवर बांधलेल्या रस्सीच्या साह्याने पैलतिरी निघाला होता तो नदीच्या मधोमध गेल्यावर त्याचा रस्सीवरील हात निसटला अन् तो नदीपात्रात पडला त्याला पोहता येत होते तरी ही अचानकपणे नदीपात्रात तो पडल्याने घाबरलेल्या हणमंतास पोहताही आले नाही त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेला, समोरील दृष्य पाहुन हडबडलेल्या त्याच्या आईला तीही मुकबधीर असल्याने त्याला वाचवा असेही बोलता येईना त्याही परिस्थितीत ती घराकडे धावत गेली अन् घरी असलेल्या पतीला तिने खुनेनेच घडला प्रकार कथन केला. पती मोहन शेंबडे यांच्या घडला प्रकार लक्षात येताच त्यांनी त्वरित बंधार्याच्या दिशेने आरडा- ओरडा करीतच धाव घेतल्याने त्यांचा आवाज ऐकुन परिसरातील लोक त्यांच्यासोबत बंधार्याच्या दिशेने धावले, घटनेचे गांभीर्य ओळखुन यातील काहीजणांनी याची खबर म्हसवड पोलीसांना व म्हसवड नगरपालिकेला कळवली. सदर ची माहिती मिळताच म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने व पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सखाराम बिराजदार हे दोघेही आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले, त्याठिकाणची स्थानिकांकडुन माहिती घेत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने बंधार्यात उतरुन बुडालेल्या हणमंताचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सदरच्या घटनेची माहिती मिळताच माण - खटावचे आ. जयकुमार गोरे हे आपला नियोजीत दौरा अर्धवट सोडुन घटनास्थळी दाखल झाले, त्यांच्यासोबत आप्पासाहेब पुकळे व इतर कार्यकर्तेही घटनास्थळी धावले, उपविभागिय अधिकारी उज्वला गाडेकर, तहसिलदार विकास अहिरे, दहिवडीचे स.पो.नि. अक्षय सोनवणे, सर्कल यु. एन. आखडमल, तलाठी भोसले आदीजण घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच बाळासाहेब काळे, सुरेश पुकळे आदींनी बंधार्याच्या पाण्यात उतरत पथकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने सोबत आणलेल्या बोटीद्वारे हणमंताचा शोध सुरु केला, मात्र तो काही हाती लागला नाही रात्री ८ वाजेपर्यंत त्याचे शोधकार्य सुरुच होते, शेवटी हे शोधकार्य थांबवण्यात आले. आज दि.१६ रोजी सकाळी ७ वा. मुख्याधिकारी डॉ. माने व स.पो.नि. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा पाण्यात पालिकेच्या पथकाकडुन शोधकार्य सुरु करण्यात आले, तासाभरातच या पथकाच्या हाती पाण्यात बुडालेल्या हणमंताचा मृत्युदेह लागल्यावर त्याला रस्सीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. नदीपात्राबाहेर काढलेल्या आपल्या मुलाचे शव पाहुन त्याच्या आई वडीलांनी फोडलेला हंबरडा पाहुन मात्र उपस्थितांचे ही डोळे पानावले. 

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकात
सागर सरतापे, गणेश चव्हाण, दिपसागर सरतापे, धिरज खंदारे, प्रवीण पिसे, दादासाहेब सरतापे, निसार मुल्ला, रज्जाक शेख, संजय जाधव आदींनी सहभागी होत बोटीद्वारे व पाण्यात उतरुन बुडालेल्या हणमंताचा सुरु केलेला शोध अखेर थांबला.

IMG-20240916-WA0008
पाण्यात बुडालेला हणमंत

 

Share this article

Tags:

About The Author

Mahesh Kamble Picture

म्हसवड तालुका प्रतिनीधी 

Related Posts

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
म्हसवडमध्ये लाडक्या बहिणींनी दिला देवाभाऊ, जयाभाऊचा नारा |
'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'