घरफोडी करणारी टोळी जेरबंद; 86 लाख 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; 86 लाख 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद केलय.पोलिसांनी त्यांच्याकडून 13 घरपोडीचे एक मोटरसायकल चोरीचा असे 14 गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून तब्बल एक किलो 200 ग्रॅम सोने एक किलो 430 ग्रॅम चांदी आणि इतर साहित्य असा 86 लाख 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. 

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना घरपोडी करणारा एक आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी मुरगुड नाका परिसरात आल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी घरपोडी करणाऱ्या बेळगाव येथील विक्रम उर्फ राजू बाळू केतुरकर याला ताब्यात घेतलं त्याने त्याचा साथीदार महादेव नारायण धामणीकर यांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यात 12 ठिकाणी तर सांगली जिल्ह्यात एक ठिकाणी घरफोडी केल्या.

000

Share this article

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'आगामी काळात भारत असणार जागतिक महासत्ता'
'ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक, पडद्यामागे चर्चा'
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता
माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर