पाचगणीतील दिया कंनवा हीने आशियाई साम्बो चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले!
पाचगणीत काढली भव्य मिरवणूक
वाई : पाचगणी आजोळ असणाऱ्या आणि राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवती येथे वास्तव्य करीत असणाऱ्या येथील दिया कंनवा हिने आशियाई साम्बो स्पर्धेत कास्य पदक जिंकून केवळ प्रदेशच नव्हे तर संपूर्ण राजस्थान आणि भारताचे नाव उंचावले आहे. याबरोबरच तिने पांचगणीचेही नाव उंचावले आहे. या यशाबद्दल पाचगणीकर रहिवाश्यांनी तिची पदकासह शहरातून भव्य अशी मिरवणूक काढली.
दिया कंनवा हीने पदक मिळवताच पाचगणी येथे ती राहत असणाऱ्या सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. आज ती पाचगणी मध्ये येणार असल्याचे समजताच दियाची भव्य अशी मिरवणूक काढण्याचा संकल्प नागरिकांनी केला. दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक बाजार पेठेकडे निघाली. यामध्ये डी जे आणि उघड्या जीपमधून पदक विजेत्या दियाची रॅली निघाली. ठिकठिकाणी रियाचे पुष्पहार घालून नागरिकांनी स्वागत केले. छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली बाजारपेठेतून सिद्धार्थ नगर कडे रवाना झाली.
दिया कणवा हीचा जन्म तसा पांचगणीमधीलच अगदी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण पांचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावर झाले. त्यानंतर तीच मूळ गाव असणाऱ्या राजस्थान मध्ये तिने पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि ती राजस्थानला गेली. त्याठिकाणी अकॅडमी मध्ये शिक्षण घेताना साम्बो या खेळाकडे आपले लक्ष केंद्रित केले. या खेळात तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आणि तिची भारताच्या संघातून आशियाई साम्बो चॅम्पियनशिप २०२४ साठी निवड झाली. ही स्पर्धा चीनमधील मकाऊ शहरात पार पडली या ठिकाणी आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत दिया कणवा हीने आंतरराष्ट्रीय स्तरावरिल कांस्यपदक जिंकले. यामुळे तिने पाचगणीचे ही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे.
000
Comment List